कोळोशी ग्रामपंचायतचा आगळा वेगळा उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत येथे आज हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. त्यामध्ये सवाष्ण स्त्रियांबरोबरच विधवा महिलांनाही हळदी कुंकवाचा मान देण्यात आला.समाजामध्ये विधवांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून गावातील विधवा महिलांना देखील सवाष्ण स्त्रियांबरोबरच हळदीकुंकू व तिळगुळ देऊन त्यांना सुद्धा समाजात बरोबरचे स्थान आहे दाखवून दिले.यावेळी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर ,उपसरपंच अतुल गुरव , ग्रामसेवक मंगेश राणे ,ग्रामपंचायत सदस्य सुचिता पोकळे, मीनाक्षी जाधव ,सानिया इंदप ,अनुजा आचरेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पूर्वा तांबे , संतोष तावडे यांसह गावातील बहुसंख्या महिला उपस्थित होत्या











