नर्मदा सेवक डॉ. ऋषिकेश ओझा यांचा ब्रम्हचैतन्य संतसाहित्य सेवा पुरस्काराने सन्मान

श्री “ब्रह्मचैतन्य “संत सन्मान सोहळा व संतसाहित्य सेवा पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न….!

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील नामांकित संस्था “श्री ब्रह्मचैतन्य” ही गेली बारा वर्ष “श्री ब्रह्मचैतन्य” या नावाने संत साहित्यावर दिवाळी अंक प्रकाशित करीत आहेत. या अंकांस होणाऱ्या तपपूर्ती निमित्त ह्या अंकाच्या संस्थापिका प.पु. कै. इंदुमती सुर्यकांत कपटकर यांच्या स्मरणार्थ श्री “ब्रह्मचैतन्य “संत सन्मान सोहळा व संतसाहित्य सेवा पुरस्कार सोहळा दि.25 जानेवारी 2024 गुरुवार रोजी पुण्यामध्ये सातव जिम्नॅशियम हॉल, सहकार नगर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दाते यांच्या सुमधुर वादनाने व दीप प्रज्वलन करुन झाली. मुकादम यांनी रामराया विठू माऊली यांच्यावरील रचलेले गायन गायले.
. डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.कुणाल खेमनार अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, प्रमुख वक्ते उल्हास दादा पवार संत साहित्य व अभ्यासक राजेंद्र पवार मुख्य अभियंता एम एस ई बी व सुधाकर पन्हाळे राजर्षी शाहू सहकारी बँक अध्यक्ष यांचा सत्कार ” श्री ब्रम्हचैतन्य ” संस्थापक संचालक व संपादक संतोष कपटकर यांनी या मान्यवरांचा सत्कार केला. श्री संत ब्रह्मचैतन्य संत सन्मान मध्ये मान्यवरां मध्ये पु. स्वामी श्री नर्मदानंदजी महाराज,.मोरेश्वर पटवर्धन काका, अजितराव कुलकर्णी, रामभाऊ जोशी, रंगा काका कुलकर्णी, मुकुंद ठकार, तारासिंग गोरवाडा यांना कुलगुरू यांनी सन्मान केला. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले यावेळी अनेक जणांनी तरुणांना संत साहित्य कडे लक्ष देऊन पुढे यावे व संत साहित्याचे समाजामध्ये चांगल्या प्रकारे रुजवावे असे मार्गदर्शन केले संत साहित्यही काळाची गरज असून समाजामध्ये राष्ट्रीयता एकोपा राहण्याकरिता खूप मोठे सगळ्यांनी कार्य करण्याची गरज आहे असे संभवण्यात आले. यानंतर संत साहित्य पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात आले यांची नावे प्रतिभाताई प्रतिभाताई गारटकर, मंगला गायकवाड, भालचंद्र साबणे, डॉ. ऋषिकेश ओझा, प्रसाद खंडागळे, शिरीष खेडेकर, उर्मिला नरवडे असे संत साहित्य मधले पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर रमेश शेठ कोतवाल अरण्येश्वर मंदिर अध्यक्ष निलेश इनामदार, नंदकुमार जाधव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भुकन, शांतीलाल बाफना, अध्यक्ष जैन स्थानक कात्रज, पौर्णिमा ताई पवार, गजानन महाराज मंदिर सहकार नगर अध्यक्ष सुप्रियाताई सुमंत, श्रीराम मंदिर ब्रह्मचैतन्य आश्रम अध्यक्ष, या सर्व मान्यवरांना विशेष सेवा सन्मान देण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र पवार यांनी सांगितले संत साहित्य संत विशेष सेवा व श्री संत ब्रह्मचैतन्य सन्मान अशा पद्धतीचा कार्यक्रम महाराष्ट्रात बहुदा प्रथम होत असावा. तसेच मान्यवरांनी संतोष कपटकर यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे आयोजन सहकार्य बाळासाहेब महाडिक, नितीन अकोलकर, सुभाष चौधरी, सुधीर बापू सुमंत, माधव खरात, डॉ धनंजय शिरोळकर, डॉ. उमेश केसकर, प्रताप जी बाठे ह्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!