” खारेपाटण येथील सर्व शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार…”- सतीश गुरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी आम्ही खारेपाटण विभागातील सर्व शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवासैनिक सतीश गुरव यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यामुळे शिवसैनिकांमध्ये नव चेतना निर्माण झाली असून पुढे येणाऱ्या लोकसभेच्या मशागतीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची जिल्हा भेट महत्वाची मानली जात आहे. शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्री विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा निवडून आणून हॅट्रिक साधण्याची व गद्दारांना धडा शिकवून गाडण्याची हीच वेळ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कणकवली येथील सभेत सांगितल्या प्रमाणे खारेपाटण येथील सर्व शिवसैनिक ताकदीनिशी शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी व तळागाळात उध्दव साहेबांचे विचार पोहचविण्यासाठी व लोकसभेच्या विजयाची गुढी उभारण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे खारेपाटण येथील शिवसैनिक सतीश गुरव यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!