जिल्हा ग्रंथालयाचा आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार त्रिंबक वाचनालय अध्यक्ष सुरेश(अन्ना) सकपाळ यांना प्रदान….!

सुरेंद्र सकपाळ कोमसापचे आजीव सदस्य

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय संघ सिंधुदुर्गचा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाचे अध्यक्ष तसेच कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे आजीव सदस्य सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांना जाहीर झाला होता. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे काल पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सकपाळ यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


सुरेंद्र सकपाळ हे गेली 20 वर्षे गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबकचे अध्यक्ष असून त्यांनी “ब” श्रेणी मध्ये असलेले वाचनालय “अ” श्रेणी मध्ये येण्यासाठी प्रयत्न करणे, अद्ययावत सुसज्ज इमारत, कर्मचारी वाढवणे, व्यायाम शाळा, वाचनालयासाठी देणगीदार जमवणे, असे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. या पुरस्काराचे श्रेय सहकारी, कर्मचारी यांना त्यांनी दिले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सकपाळ यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!