17 नवीन पदे मंजूर, त्यातील 10 नियमित तर 7 पदे आउट सोर्स ने भरणार
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पिडब्ल्यूडी चे स्वतंत्र नवीन मंडळ कार्यालय स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 26 जानेवारी रोजी ओरोस येथे सिंधुदुर्ग साठी पिडब्ल्यूडी चे नवीन मंडळ कार्यालय निर्मितीचे संकेत दिले होते. त्याची पूर्तता आज करण्यात आली.स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अधीक्षक अभियंता यासह एकूण 17 पदे भरण्यात येणार आहेत. त्यातील 10 पदे नियमित तर 7 पदे आउट सोर्स द्वारे भरण्यात येणार आहेत. स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय निर्मितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रस्ते तसेच दळणवळण सुविधा अधिक गतिमान होणार आहेत.










