हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर – जोशी चे स्टेजवर आगमन
नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या गॅदरिंगला जल्लोषात सुरुवात
कणकवली (प्रतिनिधी) : ते आले..त्यांनी पाहीले आणि त्यांनी जिंकले असाच माहोल नॅशनल इंग्लिश स्कुल नडगिवे च्या वार्षिक स्नेहसंमेलनात बघावयास मिळाले. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वार्षिक स्नेहसंमेलनास हर्षद जोशी आणि अक्षया जोशी यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली आणि उपस्थित पालक विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षकांत एकच उत्साह संचारला. स्टेजवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कांतीलाल कोथीमिरे , ऑरेंज ज्यूस टीम यांचे संस्थाध्यक्ष मनोज गुळेकर, संस्था सचिव मोहन कावले, संस्था पदाधिकारी , सीईओ शुक्ला, सर्व शिक्षक वृंदाने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. हार्दिक जोशी- अक्षया जोशी दाम्पत्याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच हार्दिक जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला.
















