शिवजयंती निमित्त भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे डबलबारी भजन

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नाटळ-सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथेविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १०:०० वा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन, ढोल वादन व लेझिम न्रत्य, दुपारी ठीक ५:०० वा पारंपारिक डबलबारी बुवा विनोद चव्हाण × बुवा गुंडू सावंत, रात्री ठीक ८:00 चित्ररथ व शोभा दिंडी.


तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाबू सावंत आणि प्रफुल्ल काणेकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!