नगराध्यक्ष संदेश पारकर अबिद नाईकांच्या घरी

रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी जात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकेकाळी कणकवली शहराच्या राजकारणात संदेश आणि अबिद ही जोडी नेहमी दिसून येत होती. काळाच्या ओघात बदलत्या संदेश पारकर आणि अबिद नाईक यांचे राजकीय मार्ग बदलले. मध्यंतरीच्या काळात नाईक आणि पारकर यांच्यात दुरावाही होता. 2025 मध्ये झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीत ही नाईक आणि पारकर यांच्यात राजकीय वितुष्ट होते. मात्र जुने जिगरी यार असलेल्या संदेश पारकर आणि अबिद नाईक यांच्या मैत्रीचा प्रत्यय आज रमजान ईद दिवशी आला. रमजान ईद निमित्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अबिद नाईक यांच्या घरी जाऊन नाईक कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिर कुर्माचा आस्वाद घेतला.

error: Content is protected !!