राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत कोल्हापूरचे रविंद्र पाटील यांना विजेतेपद, तर वीरेंद्र पाटील उपविजेता

कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ 28वी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा

तळेरे (प्रतिनिधी) : कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ 28 वी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल तरुण मंडळ पौड फाटा पुणे येथे दि. 19 मार्च 2026 या दिवशी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सुद्धा मंदार बलकवडे , श्री. मोकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय सातपुते, श्री. आकाश आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकूण 45 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा उत्तमरीत्या आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये खेळाडूंना रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर केमसे, पुनीत जोशी, श्री. बलकवडे, सुधाकर मेमाणे, सुनील आप्पा मोकर, संजय मरळ, मंदार बलकवडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, हर्षल निकम, शफिक शेख, प्रकाश चुनेकर, मयूर कदम, विकास उपस्थित होते. स्पर्धेमध्ये कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ 28 वी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा, प्रथम क्रमांक रवींद्र पाटील – कोल्हापूर, द्वितीय क्रमांक – वीरेंद्र पाटील यांनी संपादन केला तर तृतीय क्रमांक हरीश डोंबाळे, ओंकार खेडेकर, केशव मोरे, सुमित गुजर यांनी चतुर्थ, पाचवा आणि सहावा क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेची तांत्रिक अधिकारी म्हणून राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय मार्गदर्शक बिरू भोजने सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या स्पर्धा आकाश मोकर आणि त्यांच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यात आली.

error: Content is protected !!