ग्रामविकास मंडळ व शिवशाही मित्र मंडळाचे आयाेजन
नांदगाव (प्रतिनिधी) : सलग 14 वर्ष ग्रामविकास मंडळ व शिवशाही मित्र मंडळ यांच्या संयुक्तपणे असलदे गावठाण शिवाजी चौक येथे सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमा च्या आयोजनाने साजरी करणार सकाळी ९ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू महिलांचे, ४ ते ६ लहान मुलांचे फनी गेम संध्याकाळी ७ ते ७:३० मान्यवरांचे मार्गदर्शन व लहान मुलांची भाषणे रात्री ९:३० वाजता स्थानिक मंडळांची भजने
सदर कार्यक्रमास असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर खोत, पोलीस पाटील सावित्री पताडे, भगवान लोके रामेश्वर वि. का.स. मध्यवर्ती सोसायटी लिमि. असलदे, गुरुप्रसाद वायंगणकर संचालक, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करणार.












