श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ(रजि) पळसंबचे आयोजन
‘एक गाव एक शिवजयंती’ – घोष वाक्य
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथे प्रतिवर्षी प्रमाणे सोमवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री जयंतीदेवी मंदिर ते पळसंब शाळा महिलांनची भव्य रॅली, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस पुजन, 11 वाजता, शालेय मुलांनचे विविध कार्यक्रम, सकाळी 12 वाजता प्रमुख मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असा कार्यक्रम होणार आहे. तरी शिवप्रेमी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री जयंती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांनी केले आहे.













