नवीन कुर्ली फोंडाघाट येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) कडुन भवानी मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी पहाटे ०४:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी रामगड येथे जावुन शिवज्योत घेवुन ०८:३० वाजता नवीन कुर्ली येथे आगमन झाले. सकाळी १०:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी, सदस्य गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छ. शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करुन पुजा, आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.

सायंकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत वेशभुषा, पोवाडा, नाटिका, रेकॉर्ड डान्स, महारांजावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, असा विविध सांस्कृतिक सदाबहार कार्यक्रम आयोजन करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान कणकवली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब कार्यक्रम स्थळी येवुन महारांजाचे दर्शन घेवुन छ. शिवाजी महाराजांविषयी विचार मांडले व मंडळाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत मा.सभापती मनोज रावराणे उपस्थित होते.

अशा विविध कार्यक्रमांनी मंडळाकडुन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देखिल देण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी अरुण पिळणकर, प्रशांत दळवी,मंगेश मडवी, अतुल डवुर, सचिन परब, विजय आग्रे, अमित दळवी, राजेश हुंबे, सचिन साळसकर,अमित डऊर,महादेव ऐंडे आदी तर ग्रामविकास मंडळाचे राजेंद्र कोलते, सुरज तावडे, कृष्णा परब, अनंत चव्हाण, दादा गावकर, शरद पोवार,शिवाजी चव्हाण, जनार्धन पवार आदी ग्रामस्थ तर प्रिया दळवी, योगीता मडवी, मानसी चव्हाण, गीता हुंबे, आरती पिळणकर, हुंबे मॅडम आदी महिला उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन धीरज हुंबे यांनी तर आभार अविनाश चव्हाण यांनी मांडले.

error: Content is protected !!