जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१
शतकोत्तर महाेत्सवाकडे वाटचाल करणारी शाळा…..
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण गावात सन – १ ऑगस्ट १८६० रोजी स्थापन झालेली ब्रिटिशकालीन मराठी शाळा. आज शतकोत्तर महाेत्सवाकडे वाटचाल करत असून १६४ वर्षे शाळेला आज पूर्ण झाली आहेत.इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत असलेल्या या शाळेत एकूण १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर गेली १२ वर्षे ही पूर्ण सेमी इंग्लिश शाळा असून रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील केळवली,कोडवशी, मोरोशी,पन्हाळे, टाकेवाडी,मोसम, कुरंगवणे,शेर्पे, कासर्डे,वांयगणी, कुणकवण,शिडवणे या गावांसह खारेपाटण येथील मुले शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियानातून सुमारे २२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही शाळेची इमारत सुंदर व दिमाखदार स्वरूपात डौलाने फडकत आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकमेव शाळा जिथे शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत स्वछतेसाठी शिपाई ठेवला आला आहे. तर विद्यार्थ्यासाठी भाडे तत्वावर गेली दोन वर्षे विद्यार्थ्यासाठी स्कूल बस उपक्रम राबविण्यात आला.मात्र आज लोकसहभगातून प्रथमच शाळे करिता स्कूल बस घेण्यात आली आहे.व त्याचे उद्घघाटन शाळेच्या वार्षिक स्नेहसमेलन कार्य क्रमात दी.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी आज करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून शाळांची कशी सुंदर निर्मिती करण्यात येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खारेपाटण केंद्र शाळा होय. या शाळेचे केंद्र मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या बरोबरीने गेली १० वर्षे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पद सांभाळलेले माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी शाळेला एका उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे.
राज्यातील स्वछ व सर्वांग सुंदर शाळा किताब या शाळेने मिळविला असून शिक्षक भारती संघटनेने देखील या आदर्श शाळा म्हणून गौरविले आहे. सुमारे ९० लाखाच्या वर शैक्षनिक उठाव या शाळेने आजपर्यंत केला असून गावच्या ग्रामस्थांचा शाळेच्या विकासात मोठा सहभाग आहे.ज्ञान रचनावादी उपक्रमशिल शाळा म्हणून खारेपाटण शाळेला आजपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा अधिक शाळांनी शाळेला भेटी देऊन शाळेची पाहणी केली आहे.
खासदार विनायक राऊत,आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,यांसह विवध पक्षाच्या पदाधिकार्यांनी या शाळेला भेटी दिल्या आहेत.या बरोबरच जिल्हाधिकारी श्री दिलीप पांढरपट्टे,मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री बाविस्कर,महाराष्ट्र प्राथमिक राज्य शिक्षण उपसंचालक कोल्हापूर,दूरचित्रवाणी पुणे यांनी शाळेला भेट दिली आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने कोल्हापूर येथे भरविण्यात आलेल्या शिक्षणाची वारी या उपक्रमात शाळेने सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.
महाराष्ट्र राज्याच्या शैशनिक संशोधन केंद्रात या शाळेची केस स्टडीज साठी निवड.
नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून याला मान्यता दिली असून सद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” स्पर्धेत या शाळेने सहभाग घेतला आहे. व त्या दृष्टीने शाळेचे सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य परिश्रम घेत आहे.
सद्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्राप्ती कट्टी तर उपाध्यक्ष म्हणून आण्णा तेली तर माता पालक संघ उपाध्यक्ष प्रियंका गुरव व पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी मंगेश गुरव तर प्राधिकरण समिती सदस्य म्हणून गुरुप्रसाद शिंदे शिक्षण तज्ञ म्हणून मनोज करंदीकर हे काम करीत आहेत















