कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली झाली कारवाई
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : फाेंडा- कासारवाडी येथे अवैधरित्या शिकार करुन रानडुक्कर या वन्यप्राण्याचा मांस विकत असल्याचे वनक्षेत्रपाल कणकवली यांना दुरध्वनीवरुन गुप्त खबर मिळालेवरुन वनक्षेत्रपाल कणकवली यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी वनपाल फोंडा,वनरक्षक फोंडा उत्तर यांच्या समवेत तात्काळ घटनास्थळी जावुन वस्तुस्थीतीची खात्री केली असता फोंडा कासारवाडी येथे माहिती घेवुन गुरुनाथ मधुकर येंडे रा.फाेंडा यांच्यासह चंद्रकांत शांताराम शिरवलकर (रा. फोंडा) यांनी श्री. येंडे राहत्या घराच्या दक्षिण दिशेला पडवीमध्ये वन्यप्राणी रनडुक्कराचे मांस ठेवलेचे आढळुन आले,वन्यप्राणी रनडुक्कराचे मांस काळ्या रंगाच्या 37 पिशवीमध्ये आढळुन आल्याने ते ताब्यात घेतले. याबाबत अधिक कसुन चौकशी केली असता गुरुनाथ मधुकर येंडे यांच्यासह चंद्रकांत शांताराम शिरवलकर रा.फोंडा यांनी सदरचे वन्यप्राणी रानडुक्कराचे मांस हे राधानगरी जि.कोल्हापुर येथील विजय यांचेकडुन दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी घेतल्याचे सांगितले.सदरचे विकत घेतलेले मांस बारिक तुकडे करुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने विकत घेतले होते. व त्याबाबतीत विजय राधानगरी जि. कोल्हापुर यांना याबाबतीत दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.
गुरुनाथ मधुकर यांच्यासह चंद्रकांत शांताराम शिरवलकर रा. फोंडा यांनी वन्यप्राणी रानडुक्कराचा मांस अवैधरित्या खरेदीचा व्यवहार करुन तो बाजारात विकण्याचा हेतु असल्याने सदरचा गुन्हा कबुल केल्याने त्यांचेवर वन्यप्राणी रानडुक्कराच्या मृत्युस व शिकारीस कारणीभुत ठरल्याने त्यांचेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 व 44 अन्वये दिनांक 21/02/2024 प्रमाणे वनपाल फोंडा यांनी गुन्हा नोंद केला आहे.
वरील वनगुन्ह्याबाबत मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी नवाकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो.व वन्यजीव) सावंतवाडी डॉ.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी फोंडा धुळु कोळेकर, अतुल खोत व वनसेवक सुधाकर सावंत व पंच यांचे उपस्थीतीत सदरची कार्यवाही केली.
तरी कोणत्याही गावात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फासकी लावल्याचे/विषबाधा केल्याचे/वन्यप्राण्याच्या मांसाची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे वनविभागाला तात्काळ कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली यांच्या वतीने करण्यात येत आहे. या बाबत वनविभागाच्या Toll Free Number 1926 वर तात्काळ कळविण्याचे व कोणत्याही क्षेत्रात वन्यप्राण्याच्या शिकारीसारखे प्रकरण निदर्शनास आल्यास संबधीतावर वनविभागाच्या वतीने कायदेशीर कडक कारवाइ करण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले असुन त्याबाबत माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.












