आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी लि.चेअरमन सिताराम हडकर व संचालक दिगंबर जाधव यांच्या हस्ते चिंदर भटवाडी येथील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साडी वितरण करण्यात आले.राज्यातील अंत्योदय शिधापत्रक धारक कुटूंबाना प्रतिवर्षी वस्रोद्योग विभागाकडून “कॅप्टीव्ह मार्केट योजनेतर्गत यंत्रमागावर विणलेली एक साडी भेट देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते.
यावेळी हरिश्चंद्र चिंदरकर, पवित्रा पाटणकर, शुभांगी पालकर, दिपाली मसुरकर, बाळकृष्ण गोलतकर, सुरबा पालकर, पुष्पलता चव्हाण या लाभार्थ्यांना श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर चेअरमन सिताराम(देवेंद्र) हडकर, संचालक दिगंबर जाधव यांनी साड्यांचे वितरण केले. यावेळी कविंद्र माळगावकर, नार्वेकर आदी उपस्थित होते.












