जि.प.शाळा कलमठ गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कलमठ गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. प्रथम वर्ग सफाई,सजावट करण्यात आली शिवरायांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी पवार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी साधना लोधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर राज्यगीत गायन करण्यात आले.जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर वक्तृत्व स्पर्धेने उपक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यातूनच पहिले तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक- हेमंत गावकर द्वितीय क्रमांक – विघ्नेश बांदिवडेकर तृतीय क्रमांक -आरोही जाधव, उत्तेजनार्थ गौरांग डवर.

उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका रश्मी आंगणे यांनी छत्रपतींची दूरदृष्टी कशी होती आणि त्याप्रमाणे ते कसे काम करायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आग्र्याहून सुटका हा प्रसंग गोष्टीच्या रूपाने कथन केला. शिक्षिका शितल गोवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य विषयी असलेली तळमळ, सवंगड्यांसह त्यांनी केलेले कार्य, जनतेसाठी केलेले काम आणि त्यांचे अनेक गुण यांचे वर्णन याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्रीमती गौरी गवळी अंगणवाडी मदतनीस यांनीही शिवरायांवर एक चारोळी सादर केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी पवार सदस्य,अनिषा खाजनवाडकर,रश्मी आंगणे,गौरी गवळी, शितल गोवेकर सुजाता खाजनवाडकर पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी शिवरायांच्या स्फूर्तीगीताने आणि पोवाड्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आरोही जाधव हिने केले.

error: Content is protected !!