रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि डोंबिवली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्टडी अँप चे वितरण

एकूण २०० विद्यार्थ्यांना सुमारे ३,५४,००० रुपये किमतीचे स्टडी अँप वाटप

“स्टडी अँप मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक वाढ होण्यास मदत” – रोट.वंदना कामत

खारेपाटण (प्रतिनिधी) : “आजचा विद्यार्थी तांत्रिक व आधुनिक बदलाच्या युगात वावरत; असताना शिक्षणात होणारे नव नवे बदल त्याची गरज बनली असून शालेय विद्यार्थ्यांना स्टडी अँप च्या माध्यमातून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी अधिक मदत होणार असल्याचे भावपूर्ण उदगार रोट. वंदना कामत यांनी खारेपाटण हायस्कूल येथे रोटरीचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या स्टडी अँप वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.”

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.८ ऑगस्ट २०२६ रोजी शेठ न.म.विद्यालय खारेपाटण च्या कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात खारेपाटण हायस्कूल सह परिसरातील इयत्ता १० वी च्या एकूण २०० विद्यार्थ्यांना सुमारे ३,५४००० /- रुपये किमतीचे मोफत स्टडी अँप चे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी वर्ग आणि पालकांच्या वतीने रोटरी क्लब खारेपाटण आणि रोटरी क्लब डोंबीवली यांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाला खारेपाटण रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष रो.मंगेश ब्रम्हदंडे, सचिव – रो.सुबोध देसाई, रो.वर्षा बांदेकर, रो.वंदना कामत, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक रो.संजय सानप, पर्यवेशक रो.संतोष राऊत, चार्टर्ड प्रेसिडंट रो.दयानंद कोकाटे रो.संतोष पाटणकर, रो.प्रियशा अमृते, रो.सारिका महिंद्रे, रो.अजय गुरसाळे, यशवंत रायबागकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे यांनी केले. तर प्रास्ताविक रो. सुबोध देसाई यांनी केले. व शेवटी आभार. रो.अजय गुरसाळे यांनी मानले.

error: Content is protected !!