श्रीराम शेतकरी गटाला सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन फार्मर कप टीमची भेट !

भातासह मूल्यवर्धन करून रब्बी नाचणी/कुळीथ पीक घ्यावे — श्री पोमणे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ आयोजित, भात पीक स्पर्धेत श्रीराम शेतकरी गट- घोणसरी यांनी सहभाग घेतला. या गटाने एक एकर पडिक क्षेत्र भात पिकाखाली लागवडीसाठी आणले आहे. गटातील सर्व शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशन समन्वयक व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पडिक क्षेत्रावर भात शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. याची दखल घेत सत्यमेव जयते फार्मर कप टीमने गटाला भेट देऊन कौतुक केले. कोकणात गटशेती संकल्पना अजून रुजलेली नसताना या स्पर्धेत भाग घेऊन केलेले विविध उपक्रम पाहून टीम सदस्य प्रभावित झाले. गटाने फक्त भात शेती न करता यापुढे भाताचे मूल्यवर्धन करून, रब्बी हंगामात कुळीथ नाचणी सारखी पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवावे असे मार्गदर्शन पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर पोमणे सर यांनी केले. यावेळी पाणी फाउंडेशन विभागीय समन्वयक प्रशांत गवंडी, उपविभागीय समन्वयक मनीष पेडणेकर, शुभम कुरुंदवाड, मेंटॉर देवेंद्र कांबळे, मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे, उपकृषि अधिकारी मानसी वेर्लेकर,सहाय्यक कृषी अधिकारी राजलक्ष्मी हुले व गटातील शेतकरी- महिला उपस्थित होते.

error: Content is protected !!