कणकवली (प्रतिनिधी) : नवसंकल्प क्रिडा मंडळ सांगवे, आंबेडकरनगर येथे भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि.24 व 25 फेब्रुवारी राेजी आयाेजीत करण्यात आली असुन स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार व चषक कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ संदेश उर्फ गोठ्या सावंत (माजी जि.प. अध्यक्ष) सौ संजना संदेश सावंत (माजी जि.प. अध्यक्ष) यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.द्वितीय पारितोषिक 7 हजार व चषक. सरपंच संजय सावंत उपसरपंच – अभिजित काणेकर यांच्या सौजन्याने असुन तृतीय पारितोषिक 4 हजार व चषक महेंद्र सावंत माजी सरपंच ग्रामपंचायत सांगवे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी नियम व अटी • प्रथम येणाऱ्या १६ संघाना प्राधान्य दिले जाईल. खेळाडुंना दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. इतर नियम मैदानात सांगितले जातील. पंचाचा निर्णय अंतिम राहील.या स्पर्धेतील सामने एक गाव एक संघ या पद्धतीने खेळवीले जातील.
संपर्क सुमेध कांबळे – 9356601302 रोहन कांबळे – 9307219139, स्थळ – सांगवे डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर












