देवगड (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा तिर्लोट मोहूळ या शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रामचंद्र सारंग हे होते. शाळेतील मुलांच्या विविध कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.महाराष्ट्रातील विविध लोकगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.अतिशय उत्साही वातावरणात व प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने हे स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात पार पडले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. सदस्य,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी तिर्लॉट गावच्या सरपंच सौ रितिका जुवाटकर, उपसरपंच राजन घाडी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमासाठी बक्षीस रूपाने खूप रक्कम जमा झाली.रामचंद्र सारंग उद्योजक यांनी कायमस्वरूपी रंगमंच बांधून देण्याचे जाहीर केले.मुख्याध्यापक रविंद्र माने यांनी सर्वांचे आभार मानले.
तिर्लॉट मोहूळ शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न












