वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली, कोळपे, वेंगसर, उंबर्डे व कुसुर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडली. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जनसुविधा, 2515, डोंगरी विकास, आमदार निधी, जिल्हा वार्षिक अशा विविध योजनेतून सदर कामे मंजूर झाली आहेत. या कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. तिथवली येथील नाउळवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, आकरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, तांबळवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, शिंदेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तसेच कोळपे येथील कब्रस्तान येथे संरक्षक भिंत बांधणे, कोळपे बादशहा नंदकर घर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, नाचरे घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, वेंगसर कुणबीवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, वेंगसर घाडीवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, उंबर्डे कातकरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, उंबर्डे तेलीवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, उंबर्डे केळकरवाडी येथील रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, कुसुर टेंबवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, कुसूर खडकवाडी ते रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, तसेच अन्य विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी पार पडला.
याप्रसंगी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, बाळा हरयाण, हर्षदा हरयाण, हुसेन लांजेकर, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, सीमा नानिवडेकर, तिथवली सरपंच सौ. प्रियांका हरयाण, उंबर्डे सरपंच वैभवी दळवी, वेंगसर सरपंच सौ. मंचेकर, कुसूर सरपंच शिल्पा साळुंखे, पुंडलिक पाटील, धाकू पाटील, तात्या पाटील, उदय पांचाळ, महेश रावराणे, आयशा लांजेकर, बाबालाल लांजेकर, श्रेयस नेवरेकर, प्रकाश पाटील, रामदास पावसकर, एस एम बोबडे, प्रकाश सावंत, रत्नाकर बंदरकर, उमर रमदुल, अजीम बोबडे, यामिनी वळवी, किशोर दळवी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













