ब्युरो न्युज (मुंबई) : मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय. सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आवाहनही मनोज जरांगेंनी दिले. माझा बळी पाहिजे, देतो असं म्हणत फडणवीस यांचे नाव घेत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अंतरवलीत सुरु असलेला हायव्होल्टेज ड्रामा आता मुंबईत देखील पहायाला मिळणार आहे.
माझा बळी पाहिजे, देतो… देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले












