चौके (अमोल गोसावी) : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या अभियानांतर्गत शाळेच्या भौतिक सुविधा. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शालेय संरक्षक भिंत व शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर शैक्षणिक व सामाजिक संदेश देणारी चित्र रेखाटत भिंती बोलक्या केल्या, स्वच्छता मॉनिटर, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन व पुनर्वापर, गांडूळ खत प्रकल्प, परसबाग, विद्यार्थी बचत बँक, प्रथमोपचार पेटी,विद्यार्थी व शिक्षक आरोग्य तपासणी, करियर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच व्यसनाचे दुष्परिणाम या संदर्भात माहिती देण्यासाठी विविध तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, तंबाखू मुक्त शाळा हे उपक्रम प्रभावीपणे राबवले त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, शासकीय रेखाकला परीक्षा, कला उत्सव अंतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले.यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सुभाष नाईक, पर्यवेक्षिका सौ देवयानी गावडे सर्व शिक्षक,विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत घेतली,
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर ,ऍड.एस एस पवार , अध्यक्ष अजयराज वराडकर,उपाध्यक्ष आनंद वराडकर,शेखर पेणकर ,सचिव-सुनिल नाईक ,विजयश्री देसाई,सहसचिव -साबाजी गावडे ,खजिनदार -रविंद्रनाथ पावसकर ,सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर यांचे या अभियानासाठी विशेष सहकार्य लाभले,
प्रशालेच्या या यशाबद्दल सर्वच शिक्षण प्रेमी, पालक,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे…