प्रथम विजेत्यास 15 हजार, द्वितीय विजेत्या संघास 8 हजार चे बक्षीस
21 ते 22 जानेवारी दरम्यान होणार ओव्हरआर्म क्रिक्रेट स्पर्धा
कणकवली (प्रतिनिधी): रिझवी क्रिक्रेट क्लब हरकुळ बुद्रुक च्या वतीने सरपंच चषक 2023 चे आयोजन करण्यात आले असून 21 ते 22 जानेवारी दरम्यान हरकुळ बुद्रुक भाट दुकानाजवळील मैदानावर क्रिक्रेट स्पर्धा संपन्न होणार आहे. एक गाव एक संघ नुसार या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रथम विजेत्या संघास 15 हजार व आकर्षक चषक तसेच द्वितीय विजेत्या संघाला 8 हजार व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर याना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रवेश फी 1 हजार असून अधिक माहितीसाठी शाहरुख मोबा. 9561597112, सद्दाम मोबा. 9730132730, नुमन मोबा. 8975773821, नयफ मोबा 7499939560 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













