संस्कारक्षम विद्यार्थ्यांची युवा पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे काम अनमोल – अजयकुमार सर्वगोड

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्या कलमठ बाजारपेठ शाळेला भेट देत केले कौतुक

कणकवली (प्रतिनिधी) : आईवडिलांनी जरी शालेय शिक्षणाची सुविधा देण्याचे काम केले तरी शालेय दशेत संस्कारक्षम युवा पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात.कलमठ बाजारपेठ जिल्हा परिषद शाळेने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मिळविलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अत्यंत दर्जेदार भौतिक सुविधा जिल्हा परिषदच्या या शाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल सरपंच संदीप मेस्त्री त्यांचे सहकारी सदस्य, शाळेतील शिक्षक आणि सर्व पालक यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील राज्य शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्या जिल्हा परिषद कलमठ बाजारपेठ शाळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आवर्जून भेट देत शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन तसेच शाळेला परिपूर्ण सहकार्य करणारे सरपंच संदीप मेस्त्री यांचे कौतुक केले. कलमठ बाजारपेठ शाळेने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तालुका आणि जिल्हास्तर असे एकूण 11 लाख रुपयांचे पारितोषिक कलमठ बाजारपेठ शाळेने प्राप्त केले आहे. यानिमित्त सर्वगोड यांनी प्रशालेला भेट देत माहिती घेऊन मेहनत घेणाऱ्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, महेश लाड, मुख्याध्यापक मधुरा सावंत, शिक्षक प्रमोद पवार, प्रदीप मांजरेकर, विद्या लोकरे, इंदू डगरे, सावंत मॅडम. सदस्य सुप्रिया मेस्त्री, अनुप वारंग, स्वाती नारकर, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष क्रांती मोडक, विजय चिंदरकर,नंदकुमार हजारे, बाबू नारकर, समर्थ कोरगावकर, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!