भाजपा पदाधिकारी पोचले वंचित समाजबांधवांच्या वस्तीत

तरंदळे गावात साजरी केली ” पाला ” वरची दिवाळी

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे धनगरवाडी येथील भटके विमुक्त बांधवांसोबत दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी साजरी केली.
भारतीय सण अणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या आदिवासी व भटक्या विमुक्तांशी आपले असलेले भावनिक नाते घट्ट व्हावे म्हणून ही त्यांच्या सोबत आपण साजरी करत दिवाळी चा आनंद द्विगुणित व्हावा या निमित्ताने पालावरची दिवाळी साजरी केली

यावेळी कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मंडल उपाध्यक्ष संदीप सावंत,पंचायत समिती कणकवली सदस्या संजना राणे, तरंदळे सरपंच सुशिल कदम, उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडीगावकर,सुनीलदत्त जाधव,माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ सत्यवान राणे,संदेश सावंत,प्रशांत राणे,संतोष कदम,गजानन सावंत,विलास जाधव, सीताराम खरात,नरेश घाडीगांवकर,बाबुराव डोईफोडे, आनंद डोईफोडे,सखाराम खरात,अनिरुद्ध खरात,राजू जंगले,मंगेश डोईफोडे, शांताराम डोईफोडे,अविनाश डोईफोडे, रवींद्र डोईफोडे,शांताराम डोईफोडे, जानू खरात तसेच तरंदळे गावातील ग्रामस्थ,महिला बाल बालके उपस्थित होती.

error: Content is protected !!