खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती जमातीच्या घटकातील शेतकरी बांधावाना शासनाच्या सेवा योजनाचा लाभ मिळवून देता यावा या उद्देशाने कृषी यांत्रिकिकरण योजने विषयीची मार्गदर्शन कार्याशाळा आज मंगळावर दि.१७ नोव्हेंबर २०२६ रोजी “बुद्धविहार” पंचशील नगर खारेपाटण येथे संपन्न झाली.
या अनुसूचित जातीं जमाती घटक कृषी सर्व्हे पूरक कार्यशाळेला कृषी सहायक अधिकारी सागर चव्हाण यांनी उपस्थित शेतकरी महिला पुरुष यांना सखोल असे मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे सचिव सागर पोमेडकर, सह सचिव – भूषण कांबळे, बौद्धचार्य संतोष म पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ संजीवनी जुवाटकर, दीपिका गोवळकर, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर, ग्रा.पं. कर्मचारी प्रियाल पवार, संदीप पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी सहायक सागर चव्हाण यांनी उपस्थिताना महिला शेतकरी प्रमाणपत्र, त्याच बरोबर फार्मर आय डी.,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आघाती विमा योजना या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी कृषी यांत्रिकिकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी वर देण्यात येणाऱ्या कृषी विषयक शेती अवजारा विषयी सविस्तर माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचन व आभार संतोष पाटणकर यांनी केले.












