कु.अनामिका कदमची वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड
तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ४ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. कराटे स्पर्धेतील विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटातून खेळताना कु. अनामिका विजय कदम हिने 23 कि.ग्रॅ. खालील वजनगटात कोल्हापूर विभागात अव्वल स्थान पटकावले असून, तिची दि.१८ व १९ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.
रत्नागिरी येथे सलग दोन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर सांगली, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली महानगरपालिका, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडू सहभागी झाले होते.
विभागीय स्पर्धेत कासार्डे प्रशालेतील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे
१४ वर्षांखालील मुलींमध्ये
-२३ कि.ग्रॅ. वजनगटात कु. अनामिका विजय कदम – प्रथम
१७ वर्षाखालील मुलींमध्ये
-३२ कि.ग्रॅ. वजनगटात कु. वीरा दयानंद राणे – तृतीय
१९ वर्षा खालील मुलींमध्ये
कु. गौरी रवींद्र म्हस्के – द्वितीय
१९ वर्षा खालील मुलांमध्ये
८८ कि.ग्रॅ. वरील वजनगटात -विघ्नेश संतोष पेडणेकर याने – द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय या कोल्हापूर विभागीय कराटे स्पर्धेत खेळताना प्रशालेतील कु.स्वरा झोरे,निरज पवार, ध्रुव शेट्ये, अमोल जाधव व शुभम राठोड आदी कराटे पटुंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.
या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, प्रशिक्षक अभिजित शेट्ये, साईप्रसाद बिजीतकर, यांच्यासह क्रीडा विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रा.देवेंद्र देवरुखकर ,प्रा.विनायक पाताडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या गुणवंत खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या प्राचार्या बी.बी.बिसुरे, प्र.मुख्याध्यापक ए.पी.घूले, जेष्ठ शिक्षिका. आर.आर.सरवणकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












