वाभवे वैभववाडी नगरपंचायत चा भ्रष्ट कारभार ; शुक नदीवरील बंधाऱ्यात 50 लाख मुरले

खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा कारभार मनमानी व मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. शुक नदीवर ५० लाख रुपये खर्च करुन बंधारा बांधला. माञ बंधा-याचे निकृष्ट कामामुळे बंधा-यात पाणी साटत नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या कामाची चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण केली आहे. अशी माहीती खासदार विनायक राऊत यांनी पञकारांना दिली.

माईणकरवाडीनजीक शुक नदीमध्ये नगरपंचायतीच्यावतीने सुमारे ५० लाख रुपयांचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधा-याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे बंधा-यात पाणी साठा होत नाही. या कामाची चौकशी करण्याची मागणी अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर व शिवसेनेचे नगरसेवक रणजीत तावडे, मनोज सावंत यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत वैभववाडी दौऱ्यावर आले असता त्यांनी या बंधा-याची व निविदा प्रक्रीया पूर्ण होण्या आधीच काम सुरु केलेल्या संरक्षक भिंतीची पहाणी केली. यावेळी खासदार बोलत होते. ते पुढे म्हणाले, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत खोटी कामे दाखवून बीले काढली जातात. शहराच्या विकासासाठी चार दोन लाखांची कामेही महत्वाची आहेत. अनेक कामे निविदा प्रक्रीयापूर्ण करण्या अगोदरच कामे केली जात आहेत. नगरपंचायतीवर प्रशासनाचा अंकुश नाही. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी निधी लुटत आहेत. न.पं.च्या मनमानी कारभाराची चौकशी करावी. अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत. असे खासदार राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्नील धुरी, नगरसेवक रणजीत तावडे, मनोज सावंत, महेश रावराणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!