खासदार राऊत यांच्या हस्ते सातरल कासरल मधील विकास कामांचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग,रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सातरल- कासरल गावांसाठी बीएसएनएल टॉवर मंजूर झाला असून,त्याचप्रमाणे सातरल असुगिवाडी येथे दिलीप फाळके यांच्या घरापासून ते खांडबोले यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामासाठी रुपये १०.००लक्ष एवढा निधी मंजूर केला असून त्या कामांचे भूमिपूजन आज खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले.त्या मुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.त्या प्रसंगी खासदार विनायक राऊत साहेब,सतीश सावंत सावंत,शैलेश भोगले,सुशांत नाईक,अनुप वारंग गावच्या सरपंच सविता मेस्त्री ग्रा.पं. सदस्या साक्षी सुहास राणे.महिला उपविभाग प्रमुख श्रेया सावंत.तसेच शांताराम राणे,सदानंद राणे,भिकाजी राणे,दिगंबर गावकर,रवींद्र राणे,सुभाष राणे,केशव राणे,दिलीप राणे,सुभाष राणे,विनायक सावंत,हनुमंत सावंत,सुनील सावंत,रुपेश राणे,अक्षय राणे,अनिल राणे,सुहास राणे,अमित राणे तसेच अनेक शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!