ग्राहकांना न्याय, हक्क जाेपासण्याचे काम ग्राहक संरक्षण आयोग करीत आहे : ना.छगन भुजबळ

ओराेस येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग इमारतीचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात ४० ग्राहक आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यातून ग्राहकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. ग्राहकाचे हक्क जोपासण्याचे काम ग्राहक संरक्षण आयोगाचा करीत असल्याने त्याचा दबाव फसविणाऱ्या कंपन्यांवर पडू लागला आहे, असे प्रतपदान राज्याचे ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग इमारतीचे उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष सुरेंद्र तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष हेमंत कुडाळकर, जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, ऍड अमोल सांमंत, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा अध्यक्ष इंदुमती मलुष्टे, सदस्य अर्पिता फणसळकर, प्रबंधक चंद्रकांत केळुसकर, सदस्य योगेश खाडिलकर, जिल्हा वकील संघ अध्यक्ष ऍड परिमल नाईक, ऍड अमोल सामंत यांच्यासह अन्य उपस्थित होते. सुत्रसंचलन ऍड श्रीशा कुलकर्णी यांनी केले.

error: Content is protected !!