कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा 13 मार्च शिवसेना भवन मुंबई येथे रोजी खासदार विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी केलेली विकासकामे जनतेच्या मनात आहे त्यामुळे जनताच राऊत याना लीड ने विजयी करेल. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात युवा सेना जोमाने काम करून राऊत यांच्या विजयात हातभार लावणार आहे. गावागावात मागील दोन वर्षांत युवासेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार असून विनायक राऊत यांच्या विजयात कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेना सिंहाचा वाटा उचलेल असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.
विनायक राऊत यांच्या विजयात युवासेनेचा सिंहाचा वाटा असेल – सुशांत नाईक












