लोकसभेला विनायक राऊत यांचा अडीच लाख मतांनी विजय – संदेश पारकर
कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मुंबईस्थित ठाकरे गट पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना भवन मुंबई येथे 13 मार्च रोजी 5 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले. विनायक राऊत यांकब्या समोर विरोधी उमेदवार अद्याप मिळत नाही आहे. विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असल्याचेही पारकर म्हणाले.केंद्रीयमंत्री राणे विरोधात उभे असतील तर एकतर्फी विजय हा राऊत यांचाच असेल. कणकवली मतदारसंघात मोठे मताधिकक्याने राऊत याना लीड देऊ . अडीच लाखांच्या मतांनी खासदार राऊत विजयी होतील असेही पारकर म्हणाले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग उपस्थित होते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना वाढता पाठिंबा जनतेचा मिळत आहे. कालच वरवडे येथील मुस्लिम बांधव शिवसेनेत दाखल झाले. जनतेचा कौल हा खासदार राऊत यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा लाखो मतांनी विजयी होत विनायक राऊत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक करतील असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज विनायक राऊत यांच्या प्रयत्नानेच सुरू झाले. निसर्ग वादळात जनतेला पुनर्वसनासाठी राऊत यांनी मेहनत घेतली. विकासाची अनेक कामे खासदार राऊत यानी केले. मतदारसंघात असलेल्या 2200 गावांत दांडगा जनसंपर्क त्यानी ठेवला आहे. नानार, बारसु येथील प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाला जनतेच्या मनात असलेला विरोध ताकदीने राऊत यांनी केला. संसदेत जनहिताची अनेक कामे लावून धरत त्यानी पूर्ण केली. त्यामुळे जनतेच्या मनात राऊत हेच पुन्हा खासदार व्हावेत असेच आहे. खासदार राऊत यांच्या विजयासाठी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. त्यामुळे मोठे यश मिळवून राऊत विजयी होतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेलं काम जनतेला आवडले आहे. महाराष्ट्रात उद्धव यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि इंडिया आघाडीला मोठे यश लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला.












