सावंतवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार ज्योती दुधवडकर याना पतीशोक
आंबोली (प्रतिनिधी) : हृदयविकाराचा झटका आल्याने आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार जगदीश दूधवडकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रात घडली. त्यांना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने जाहीर केले. दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आंबोली येथील पोलीस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आज सकाळी ते पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अचानक जोराचा झटका आल्यामुळे ते जागीच कोसळले त्यांना अधिक उपचारासाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले परंतु सहकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ज्योती दुधवडकर यांचे ते पती होत. काल नेहमीप्रमाणे ते ड्युटी बजावणीसाठी आंबोली येथे गेले होते. सकाळी तुळशी वृंदावनाला पाणी घालत असताना झटका आल्याने अचानक ते जागीच कोसळले. ते मुळचे परूळे येथील आहेत.












