म.रा.प्रा.शि. समितीच्या वतीने संविता आश्रमास किराणा साहित्याचे सहाय्य
खारेपाटण (प्रतिनिधी) : ” समाजात निराधार आणि वंचिताचा प्रश्नच निर्माण होवू नये म्हणून कुटुंबांतील व्यक्तींची मानसिकता बदलायला हवी.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव राजन कोरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. तर समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी संविता आश्रमचे संदिप परब यांचा गौरव करत त्यांचे ठायी पितृहृदय आणि मातृहृदयाचा संगम आसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या महिला आघाडी जिल्हा सिंधुदुर्गचे पदाधिकारी व सभासदांचे पुढाकारातून व जिल्ह्यातील शिक्षक बंधुभगिणींनी च्या सहभागातून नुकतेच पणदूर च्या संविता आश्रमास भेट देण्यात आली.. ८ मार्च – जागतिक महिला दिन आणि १० मार्च – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आश्रमास किराणा साहित्याची भेट प्रदान करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर यांनी या कार्यक्रमासाठी शिक्षक बंधुभगिणींचा उत्स्फुर्त सहभाग लाभल्याचे सांगीतले.
जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी आश्रमच्या कार्याची संक्षिप्त माहिती देवून शिक्षक बांधवांनी आयोजित केलेल्या या स्तुत्य अशा कार्यक्रमासाठी त्यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमप्रसंगी शिक्षक समितीच्या राज्य संघटक निलम बांदेकर, जिल्हा नेत्या व प्रेरक सुरेखाताई कदम, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, जिल्हा सल्लागार नितीन कदम,पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक,पतपेढी संचालक चंद्रसेन पाताडे व रूतुजा जंगले जिल्हा उपाध्यक्ष रूपेश गरूड , सतिश राऊळ व जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांची उपस्थीती होती. महिला आघाडी जिल्हा सचिव वैभवी कसालकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व उपस्थीत मान्यवर व सभासदांचे आभार मानले.














