कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एन.एच ६६ ते बिबवणे मांगलेवाडी रस्ता ग्रा.मा. ४०६ खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ८९ लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या प्रति गौरवउद्गार काढले.











