पडेल येथील कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) : पडेल प्राथमिक शाळा नं 1 येथे कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखाच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. दिक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्य कला क्रिडा क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. दिक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दिक्षित यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल,वाडा हायस्कुल व देवगड हायस्कुलमध्ये संगणक कक्ष उभारले आहेत. तसेच तेथील विदयार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील ते वारंवार करीत आहेत. नुकतीच राज्यस्तरीय रामगितगायन स्पर्धा देखील या संस्थेच्या माध्यमातून वाडा दत्तमंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. असे नाविन्यपुर्ण उपक्रम या संस्थेचे संचालक निरंजन दिक्षित यांनी सामाजिक बांधिलकिच्या दृष्टीकोनातून समाजहित जोपासण्याचे काम करीत आहेत. या शिबिराला पडेल सरपंच भुषण पोकळे,इंदिराकांत महांबरे,माजी सरपंच संजय मुळम,ठाकुर देसाई आंबा सर्व्हिचे मालक केवल ठाकुरदेसाई,वैभव वारीक आदींनी भेट दिली. तसेच पडेल हायस्कुलचे मुख्याध्यापक हिराचंद्र तानावडे यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले.

error: Content is protected !!