भर बाजारपेठेत मटका केंद्र सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : एस पि सौरभ अग्रवाल यांनी दिलेल्या मटकाबंदी च्या आदेशाला खारेपाटण गावात केराची टोपली दाखवण्याची हिम्मत मटका बुकींनी दाखवली असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.भर बाजारपेठेत मटका व्यवसाय जोरदार सुरू असून यातून दरदिवशी 10 हजारहून अधिक रक्कमेची उलाढाल सुरू आहे. यात मटका बुकींचे खिसे भरले जात असून हातावर पोट असणाऱ्या आणि मटका खेळण्याची सवय असलेल्यांचे बायका पोरे मात्र हलाखीत जगत असल्याचे चित्र आहे. अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी सक्त आदेश एसपी अग्रवाल यांनी दिलेले असतानाही भर बाजारात मटका केंद्र सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.












