सांधेदुखी साठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये
दि. 12 मार्च ते 19 मार्च 2024 वेळ स. 10 ते सायं. 5.30 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग तर्फे सांधेदुखीसाठी खास पंचकर्माचे आयोजन 12 मार्च ते 19 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वा. या वेळेत फक्त 699 रुपयांत आयोजित करण्यात आले आहे. वाताचे विकार, जसे की सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, हालचाल करताना सांध्यांमधून आवाज येणे, कंबरदुखी, पाठ दुखी, सांध्यांमध्ये गॅप मान दुखी, फ्रोझन शोल्डर, अंग लुळे पडणे, नसा कमकुवत होणे, स्पाँडिलोसिस इत्यादींसाठी या पंचकर्माचा विशेष फायदा होतो. या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील स्नायुंना पोषक तत्वे आणि रक्त पोचवण्यासाठी व मांसपेशींना ताकद मिळवण्यासाठी विशिष्टपद्धतीने औषधी तेलाने मसाज केला जातो. काढ्याने वाफ दिली जाते त्यामुळे सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधार होतो. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून कणकवली साठी 9373183888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी 7774028185 या नंबर वर संपर्क साधावा.













