धामापूर ग्रामपंचायतवतीने उपक्रमशील शिक्षक दिपक गोसावी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देउन सन्मान


चौके (प्रतिनिधी) : 19फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिपक गोसावी यांना धामापूर ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2023 चा देऊन विद्यमान सरपंच व उपसरपंच व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिपक गोसावी यांनी सन 2019 पासून धामापूर बौध्दवाडी शाळेचा ग्रामस्थांच्या सहकार्याने भरीव असा शैक्षणिक उठाव करून शाळेला नावालौकिक प्राप्त करून दिला आहे शिवाय शाळा आनंददायी बनवली आहे. शाळेमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. या आधी गोसावी सरांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. . धामापूर गावाचे उद्योगपती महेश परब व विद्यमान सरपंच सौ मानसी परब यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार देण्यात आला. बौद्धवाडी शाळेची या सर्वांनी पाहणी केली व फारच आदर्शवत शाळा बनवण्यात व आपल्या धामापूर गावाचे नाव राष्ट्रीय व राज्य स्तरावर सरांनी नेले त्याबद्दल सर्व धामापूर ग्रामस्थांनी सरांची या पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!