आचरा येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मोफत नोंदणी शिबीर….!

भाजप आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळाकडून आयोजन

जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप नेते निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा येथे शनिवार 16 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मांगल्य मंगल कार्यालय येथे मोफत प्रधानमंत्री विश्वाकर्मा सन्मान योजना नोंदणी शिबीर भाजप आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप नेते निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेते विलास हडकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

नोंदणीसाठी ओमकार आचरेकर, चंदू कदम, दादा धुरी-आचरा, एकनाथ पवार, परेश चव्हाण, विवेक परब-चिंदर, पळसंब सरपंच महेश वरक-सुहास सावंत पळसंब, रावजी सावंत, उमेश सावंत-वायंगणी, शेखर सुतार, लता मेस्त्री, संदेश रावले-त्रिंबक, नरेंद्र मेस्त, धर्माजी कोचरेकर- तळाशील, तोंडवळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी आचरा विभाग प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!