वैभववाडी शहरातील गटारांत कचऱ्याचे साम्राज्य ;स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

नगरोस्थान च्या गटारांची वैभववाडी नगरपंचायतने बनवली कचराकुंडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. आज या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॉटल चे प्रमाण खूप प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्या पाठोपाठ प्लास्टिक पिशव्यांचा त्यामध्ये समावेश होतो. एकीकडे वैभववाडी शहरात रोज कचरा उठाव केला जात असला तरी दुसरीकडे मात्र शहरातील गटारे कचऱ्यांनी भरलेली पहायला मिळत आहेत. आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गावर दंडात्मक कारवाई करणारी नगरपंचायत गटाराच्या शेजारील दुकानांच्या परिसरातील गटारीत सोडा, दारु अशा अन्य शितपेयांच्या बाटल्या आढळतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवीत असल्याचे यानिमित्ताने दिसून येते.

नगरपंचायत शेजारील गटारांची झालेली कचराकुंडी स्थानिक प्रशासनाला दिसत नाही.की जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. भविष्यात गटारे तुंबून डासांची उत्पत्ती होऊन व रोगराई पसरल्यावर प्रशासनाला जाग येणार का.? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!