महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने २१ व २२ रोजी आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या राष्ट्रीय संघटनेच्या मुंबई अधिवेशना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक एम्प्लॉइज संघटनेच्या वतीने दि.२१ व २२ जानेवारी २०२३ या सलग दोन दिवशी ग्राहकांसाठी व सर्व नागरिकासाठी आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक एम्प्लॉयज संघटनेचे अध्यक्ष कॉ. नंदकुमार चव्हाण व निमंत्रक कॉ. श्री संतोष रानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या आर्थिक साक्षरता अभियानाद्वारे नागरिक व ग्राहकाना बँकिंग व वित्त विषयक विस्तृत माहिती देणे. तसेच बँक खाजगीकरणामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना उद्भभवणारे धोके या अभियानातून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा संघटनेचा प्रयत्न असल्याचे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.तसेच आर्थिक साक्षरता अभियानाच्या माध्यमातून प्रसिध्दी करण्यात आलेल्या पत्रकात खालील महत्वाच्या मुद्द्यावर ग्रहकमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.१)”जर सार्वजनिक शेत्रातील बँकांचे खाजगीकरण झाले तर.. २)”बँक खाजगीकरण एक मृगजळ”
३) सार्वजनिक शेत्रातील बँकांचे खाजगिकरन झाले तर सर्वसामान्य जनतेला वाली कोण ?
४) सार्वजनिक शेत्रातील बँका कर्ज बुडव्यांना विकू नका तरी दि.२१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या आर्थिक साक्षरता अभियानात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा.असे आवाहन महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज असोसिएशन सिंधुदुर्ग. जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!