आपल्या परिसराची स्वच्छता सर्वांनी घेणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे – सरपंच संजना आग्रे

स्थानकावरील असुविधाबाबतच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे, प्रवासी संघटनेचे अधिकारीना आवाहन !

फोंडाघाट एन.सी.सी. विभागाकडून एसटी स्टँड ची स्वच्छता ! प्रवाशांकडून कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : व्यवसाय – उद्योग – वाहन चालक प्रवासी यांनी आपल्या आजूबाजूचा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्रामपंचायतकडून पुरवण्यात आलेल्या कचराकुंडी टाकल्या, तर स्वच्छतेसह शासनाच्या मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ सुंदर बस स्थानक ” अभियानाचा शासनाचा उद्देश सफल होईल. त्यासाठी स्थानक प्रमुख, स्वच्छता कर्मचारी, परिसरातील दुकानदार, रिक्षा-वाहन चालक आणि प्रवाशांनी सहकार्य करावे. लोकजागृतीतून स्वच्छता अभियानाचे फलक लवकरच लावले जातील. असे सांगून फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांनी हायस्कूलच्या एन सी सी कॅडेटच्या श्रमदानाचे कौतुक केले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर एन सी सी विभागातर्फे फोंडाघाट स्थानक प्रमुख यांच्या विनंती अर्जानुसार मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “सुंदर बस स्थानक” अभियानांतर्गत छात्र सेनेने एसटी स्टँड आवार चकाचक केला. गुटखा पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या- कागद- कचरा-प्लास्टिकच्या वस्तू- खराब भाजीपाला व अन्य टाकाऊ वस्तु एकत्र करून ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये भरगच्च भरून परिसर स्वच्छ केला. यावेळी एस.टी विभागीय सांख्यिकी अधिकारी क्षमा नाडकर्णी स्थानक प्रमुख जी.के.राठोड एस.टी. पवार, कॅडेट कमांडो आर्या भोगले, अजिंक्य पोकळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी एस.टी अधिकारी यांच्याशी बोलताना फोंडाघाट एस.टी स्टँड वरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालय, कॅन्टीन, पार्किंग आणि परिसरातील खड्डे तसेच स्वच्छतेसह गंभीर बनत चाललेले प्रश्न, प्रवासी- ग्रामस्थ यांनी निदर्शनास आणून देताना, या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

एकंदरीत हायस्कूल एन सी सी च्या छात्रांच्या श्रमदानातून स्वच्छतेचे सर्व प्रवासी- ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. मात्र कचरा न होता त्याचा प्रतिबंध आणि पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक, व्यावसायिक प्रवासी रिक्षा वाहन- चालक, एस टी प्रशासन आणि ग्रामपंचायतीने स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपस्थित मधून व्यक्त होत होते.

error: Content is protected !!