रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये लिटिल फ्लावरच्या आठ व फोंडा हायस्कूलच्या एका विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल पातळीवर निवड !

लिटील फ्लॉवरच्या मुलांचे अन् हायस्कूलच्या केतन चव्हाण याचे सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित, नॅशनल पातळीवरील कलरिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत, लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल- फोंडाघाट आणि फोंडा हायस्कूल मधून सुमारे ६५ विद्यार्थी- विद्यार्थिनी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी हायस्कूलच्या केतन निलेश चव्हाण याची कार्टून विभागात नॅशनल टॉपर म्हणून निवड झाली आहे. तर लिटिल फ्लावरच्या तन्मय अमिताभ चव्हाण . सानवी समीर भालेकर. रसिका विजय कसवनकर,वैदेही भास्कर बिडये,श्रेया साहिल डोरले, अथर्व अनिल जगताप ,मृदा सुखदेव पवार, अस्मी सुजित हिंदळेकर यांची इंटरनॅशनल पातळीवर कलरिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांना कलाशिक्षक नीलाक्षी चव्हाण यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले यांना संस्थेतर्फे ” द साल्वाडोर डाली ” अवार्ड तर प्राचार्य विनया लिंग्रस यांना ” बेस्ट अचिव्हमेंट ” अवॉर्डने गौरविण्यात आले.

निवड झालेल्या स्पर्धकांना संचालक राजू पटेल, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, यांच्या विशेष उपस्थितीत अवॉर्ड चिन्ह देऊन गौरविण्यात आले. पर्यवेक्षक प्रसाद पारकर सर, करुणा चींदरकर, राठोड सर, गौरी गावकर ,रिया भिसे, श्वेता शिंदे, मदतनीस उर्मिला कूशे यांचे सह पालकांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले.

error: Content is protected !!