मुळदे एलपालववाडी येथे बेसुमार पाण्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा

कुत्रिम पाणी टंचाई विराेधात मुळदे मागासवर्गीय नागरी संतप्त

1 एप्रिल राेजी जि.प.समाेर आंदाेलन छेडणार

ओराेस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील मुळदे मागासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थांना सध्या कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या मागासवर्गीय वस्तीनजिक असलेल्या एलपालववाडी येथे शासकीय निधीतून उभारलेल्या विहिरी व्यतिरिक्त येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मात्र, तेथील काही ग्रामस्थ हे पाणी व्यक्तिगत पंप टाकून बेसुमार वापरत आहेत. त्यामुळे या सबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अन्यथा १ एप्रिल २०२४ पासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांना देण्यात आले आहे. यावेळी नागेश जाधव, गुरुनाथ चव्हाण, तुषार जाधव, निखिल जाधव, चैतन्य जाधव, बाळकृष्ण जाधव, मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते. या निवेदनावर ४२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!