प्रशासनाच्या अकार्यक्षम अधिकारी वर्गामुळे दलीत वस्ती विकासा करीता असलेला १२ लाख रुपये निधी परत गेला…

खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांना खीळ

खारेपाटण येथील अनुसुचीत जाती समाज बांधवांकडून तीव्र नाराजी

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील किंबहूना ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील अनुसूचित जाती बौद्ध,नवबौद्ध घटकांच्या विकासा करीता अर्थात दलीत वस्त्या करीता असलेला निधी वेळेत विकास कामांचे अंदाजपत्रक तसेच एस्टीमेंट सादर न केल्यामुळे सुमारे १२ लाख रुपये एवढा मोठा निधी प्रशासनातील अकार्यक्षम अधिकारी वर्गाच्या बेपर्वाई मुळे खर्च होता शासनाकडे परत गेला. कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण पंचशील नगर येथील दलीत वस्तीवर हा निधी खर्च करण्यात येणार होता. याबाबत खारेपाटण येथील अनुसूचित जाती तथा बौद्ध बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून सबंधित अधिकारी वर्गाना दलीत वस्त्यांचा विकासच करायचा नाही आहे का? असा सवाल खारेपाटण येथील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच खारेपाटण दलीत वस्ती विकासाचा प्रश्न निर्माण झाल्याने राजकीय पक्ष कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायत मार्फत खारेपाटण पंचशील नगर येथे दलीत वस्ती निधीतून रस्ता करणे बाबत प्रस्ताव कणकवली येथील मा.अभियंता बांधकाम जि.प. बांधकाम उपवीभाग कणकवली यांचेकडे सादर करण्यात आला होता.

गटविकास अधिकारी कणकवली यांच्या मागणी नुसार परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता.याबाबत डिसेंबर २०२३ मध्ये प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी देखील अधिकारी वर्गाने येऊन केली होती.व सदर रस्त्याला मंजुरी देऊन नागरिकांना आश्र्वासित केले होते. परंतु आता ३१ मार्च जवळ आला त्यामुळे रस्त्याचे काय झाले असे ग्रमस्थानी विचारता सदर रस्त्याचे अंदाजपत्रक वेळेत न बनविल्यामुळे व प्रस्ताव सादर न केल्यामुळे खारेपाटण दलीत वस्तीय करीता राखीव असलेला सुमारे १२ लाख रुपयेचा निधी विना खर्च होता शासनाकडे परत गेला असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.

याबाबत नुकतेच खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत उपसरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच तातडीने बांधकाम विभाग कणकवली शाखा अभियंता यांची भेट घेऊन दलीत वस्तीच्या निधी बाबत विचारणा केली असता प्रशासनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग अर्थात अभियंता ची कमतरता असल्यामुळे खारेपाटण येथील दलीत वस्तीतील विकास कामाचे इस्टीमेंट बनू शकले नसल्याचे बेजबाबदार पणाचे उत्तर सबंधित अधिकाऱ्याने दिले. निधी उपलब्ध असताना देखील दलीत वस्तीला विकासा पासून वंचित ठेवनाऱ्या कणकवली येथील अभियंता श्री चव्हाण या अधिकाऱ्याची लेखी तक्रार खारेपाटण माजी सरपंच महेंद्र गुरव यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,मुख्य कार्य. अधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे केली आहे.दरम्यान अभियंता श्री चव्हाण याना वेळोवेळी भेटून देखील त्यांनी खारेपाटण येथील दलीत वस्ती विकासकामांचे एस्टीमेंट मार्च अखेरपर्यंत केले नसल्याचे निदर्शनास आले.

खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण पंचशील नगर येथील दलीत वस्ती विकासासाठी अगदी खासदार, आमदार जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रा.पं.सदस्य यांचा स्वनिधी तर सोडाच पण शासनाने अनुसूचित जातीच्या व बौद्ध बांधवांच्या कल्याण करीता राखीव ठेवलेला निधी देखील मस्तवाल अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे काम न करता अखर्चित ठेण्यात येत असेल व परिणामी राज्यातील व ग्रामीण भागातील विकास कामांना अशा प्रकारे खीळ बसत असेल तर जनतेने विश्वास तरी कोणावर ठेवायचा ? असा संतप्त सवाल देखील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!