कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची सुरुवात आज सकाळी ९:०० वा रक्तदान शिबिराने झाली. कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना व रक्तदानसाठी मदत करणा-या रक्तपेढीच्या कर्मचार्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संजना संदेश सावंत, विजय भोगटे, सरपंच संजय सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, सानिका गावकर, मयुरी मुंज, मिलन पवार, प्रफुल्ल काणेकर, संजय सावंत, अनिल पांगम, नितीन गावकर, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरात्री ९:०० वा दशावतारी नाटक श्री वेतोबा(चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण ,मालक- देवेंद्र नाईक) स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान यांनी केले आहे.













