आंबोली (प्रतिनिधी) : चंदगड येथून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरील खडीवर दुचाकी घसरून ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. आज रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणी येथे हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना उपचाराकरिता सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. जीलानी मेहबूब शेख (27वर्ष), अजाण इस्ताक शेख (26वर्ष), नुर अहमद सनदी (30वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत. याबाबतची माहिती आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली असून पोलीस अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.












