खारेपाटण (प्रतिनिधी) : नृत्य शेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावचे सुपुत्र असलेल्या योगेश शांताराम पाटणकर यांच्या नृत्य दिग्दर्शन शेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
नृत्य शेत्रातील पुरस्कार वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला अवार्ड शो म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा समाज हॉल कुडाळ येथे दि.२९ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांसह रंगकर्मी केदार सामंत,केदार देसाई,साईनाथ जळवी,प्रणय तेली,अनंत जामसंडेकर, नाईक, पावसकर,चिमणी पाखरचे सल्लागार सुनील भोगटे,अध्यक्ष रवि कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण,पंचशील नगर येथील रहिवासी असलेले व व्यसायाने नृत्य दिग्दर्शक असलेलेयोगेश पाटणकर हे सद्या मराठी बाणा या अशोक हांडे यांच्या मोठ्या ग्रुप कार्यक्रमात काम करत असून आवाज की दुनिया,मंगलवाणी – दांगलवाणी,गणे सुहाने, आझादि – ७५ अशा विविध कार्यक्रमात आपली नृत्य कला सादर केली आहे.तसेच सोनी मराठी,कलर्स मराठी, सण मराठी,स्टार प्रवाह, ई टिव्ही व सह्याद्री दूरदर्शन आदी टिव्ही चॅनल वरील विवीध नृत्य कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत आपली कला सादर केलेली आहे. सिंधुदुर्ग,रत्नागिरी ठाणे यांसह मुंबई आदी ठिकाणी विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डान्स कोंपिटिशन मध्ये परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देत विद्यापीठ स्तरापर्यंत स्पर्धेमध्ये घेऊन गेले आहेत.नृत्यकले बरोबरच ते सामाजिक कर्यात देखील अग्रेसर असून खारेपाटण ग्रा.पं.चे ते सदस्य म्हणून कार्यरत होते.खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण या सामाजिक मंडळाचे ते सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. नृत्य शेत्रात मागील २० वर्षे कार्य करत असलेल्या खारेपाटण येथील योगेश पाटणकर यांच्या कार्याची दखल घेत चिमणी पाखरं या संस्थेच्या वतीने नृत्य दिग्दर्शक योगेश पाटणकर यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.













